रेल्वेतून पडून ‘जेजे’तील डॉक्टरचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:29 IST2024-09-26T08:24:17+5:302024-09-26T08:29:06+5:30
जेजे रुग्णालयातील जन औषधवैद्यकशास्त्र विभागातील पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला

रेल्वेतून पडून ‘जेजे’तील डॉक्टरचा अपघाती मृत्यू
नवी मुंबई : जेजे रुग्णालयातील जन औषधवैद्यकशास्त्र विभागातील पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी वाशी खाडीपुलालगत झाला. डॉ मुकुल चव्हाण असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. यापूर्वी ते वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात देखील काही काळ नियुक्त होते. या दुर्घटनेची वाशी रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे.
बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पनवेल-सीएसएमटी लोकलने मुंबईच्या दिशेने चालले होते. यावेळी लोकलमध्ये गर्दी असल्याने ते दरवाजाजवळ उभे होते.
ही लोकल वाशी स्थानकातून खाडीपूल जवळ आली असता मुकुल चव्हाण रेल्वेतून खाली पडले. या दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी सांगितले.