वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By योगेश पिंगळे | Updated: March 16, 2023 18:45 IST2023-03-16T18:45:18+5:302023-03-16T18:45:56+5:30
वाशी येथील सेंट मेरी शाळेतील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या चालत्या व्हॅनला वाशी सेक्टर 1 येथे आग लागली.

वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
नवी मुंबई : वाशी येथील सेंट मेरी शाळेतील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या चालत्या व्हॅनला वाशी सेक्टर 1 येथे आग लागली. यावेळी व्हॅनमध्ये सुमारे 12 विद्यार्थी होते. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने व्हॅन थांबवून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित नागरिक आणी अग्निशमन दलाच्या जवानांनी अगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे स्कुल व्हॅनने क्षमतेपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.