पीआयएफच्या वादग्रस्त चिठ्ठी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; अटक नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 20:27 IST2023-06-25T20:27:34+5:302023-06-25T20:27:45+5:30
खांदेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीआयएफच्या वादग्रस्त चिठ्ठी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; अटक नाही
पनवेल - नवी पनवेल मधील सेक्टर 19 मधील नील आंगण इमारतीमध्ये पीएफआय जिंदाबाद व दोन सुतळी बॉम्ब लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न दि.24 रोजी समोर आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीचा शोध सुरु आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या प्रकारामुळे नील आंगण सोसायटी मधील रहिवासी दाहशतीच्या छायेत आहेत. पोलिसांनी या घटनेबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. या घटनेतील आरोपीचा शोध सुरु आहे.आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलीस तपासत आहेत.