शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

एपीएमसीच्या शौचालयात घोटाळ्यात आमदार शशिकांत शिंदेंसह सात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By नारायण जाधव | Updated: November 11, 2023 20:14 IST

शशिकांत शिंदे यांच्यासह सात आजी-माजी अधिकाऱ्यांविरोधात शनिवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी मुंबई :

शासनाने वेळोवेळी दिलेे निर्देश आणि न्यायालयाच्या सूचनांना अव्हेरून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजारपेठांमधील सार्वजनिक शौचालयांचे मर्जीतील संस्थांना मनमानीपणे वाटप करून बाजार समितीचे सात कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान केल्याच्या चौकशी समितीच्या ठपक्यावरून माजी मंत्री तथा बाजार समितीचे कामगार संचालक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात आजी-माजी अधिकाऱ्यांविरोधात शनिवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

शासनाचे विशेष लेखा परीक्षक भगवान तुकाराम बोत्रे यांनी शासनासह नवी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या चौकशी अहवालांचा हवाला देऊन शनिवारी संध्याकाळी पाच वाजता हा गुन्हा केला.

आराेपींमध्ये यांचा समावेशआराेपींमध्ये आमदार शशिकांत शिंदेंसह बाजार समितीचे तत्कालीन उपसचिव रवींद्र आनंदराव पाटील, जी. एम. वाकडे, सीताराम कावरखे या सेवानिवृत्त उपसचिवांसह विद्यमान उपसचिव विजय पद्ममाकर शिंगाडे, उपअभियंता सुदर्शन भोजनकर, कनिष्ठ अभियंता राजेंद्र पांडुरंग झुंजारराव आणि कार्यालयीन अधीक्षक विलास पांडुरंग पवार या सात आजी-माजी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या सर्वांनी १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात सर्व नियम पायदळी तुडवून मर्जीतील संस्थांना बाजार समितीच्या आवारातील विविध शौचालयांचे आपल्या मर्जीतील मारू सेवा संघ, विकास कन्स्ट्रक्शन्स, अमोल कन्स्ट्रक्शन्स, भूमी कन्स्ट्रक्शन्स या संस्थांना त्यांच्या मूळ उद्दिष्टांमध्ये प्रसाधन गृह चालविणे नसतानाही वाटप केले. तसेच काहींचे भाडे कमी केले, सुरेश मारू यांना नियमबाह्य वाटप केले आणि या सर्व बाबींकडे तत्कालीन सचिव सतीश सोनी यांनी दुर्लक्ष केले, असाही ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे.बाजार समितीतील या शौचालय घोटाळ्याबाबत आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित करून यापूर्वीच्या चौकशी अहवालात त्रुटी असून, न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन झाल्याची बाब निदर्शनास आणली होती. त्यानंतर शासनाचे उपसचिव रवींद्र औटे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांना कळवून चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त विशाल मेहुल यांनी फेरचौकशी करून ९ ऑगस्ट २०२३ रोजी गृहविभागाकडे आपला अहवाल पाठविला होता. हा अहवाल शासनाने पणन संचालकांना पाठविला. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई