अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:12 IST2023-02-21T12:11:55+5:302023-02-21T12:12:27+5:30

पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी बाहेरून बारावीला बसला होता

A 12th student committed suicide on the day of the exam due to boredom | अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

अभ्यासाला कंटाळून परीक्षेच्या आदल्यादिवशीच १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या 

नवीन पनवेल : पनवेल शहरातील बारावी इयत्तेत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याने 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी (देवदर्शन सोसायटी) अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.     

पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी बाहेरून बारावीला बसला होता. 20 फेब्रुवारी रोजी त्याने राहत्या घरात फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आई वडील बाहेर गेले होते. ते घरी आले त्यावेळेस त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी लॅचच्या साह्याने दरवाजा उघडला. यावेळी मुलाचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

Web Title: A 12th student committed suicide on the day of the exam due to boredom