एनएमएमटीकडून ६८ बस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:27 AM2019-10-21T00:27:10+5:302019-10-21T00:27:45+5:30

सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत एनएमएमटीच्या ६८ बस पुरवण्यात आल्या आहेत.

68 buses available from NMMT | एनएमएमटीकडून ६८ बस उपलब्ध

एनएमएमटीकडून ६८ बस उपलब्ध

googlenewsNext

नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेत एनएमएमटीच्या ६८ बस पुरवण्यात आल्या आहेत. स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशिन मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासह मतदानानंतर पुन्हा त्या स्ट्राँगरूममध्ये नेण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. ऐरोली, पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रात या गाड्या वापरल्या जाणार आहेत.

संबंधित विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून झालेल्या मागणीनुसार या बस पुरवण्यात आल्या असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले. त्यानुसार निवडणुकीच्या प्रक्रियेतील अधिकारी व बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठीही या गाड्यांचा वापर केला जाणार आहे.

Web Title: 68 buses available from NMMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.