शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये ४ हजार ९२४ बाळांचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:53 AM

सुखरूप प्रसूती । शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयाचा आधार

अरुणकुमार मेहत्रे ।कळंबोली : लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, पनवेल पालिका हद्दीत कोरोना काळात शासकीय रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयात ४ हजार ९२४ बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णांसाठी महापालिका क्षेत्रात ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चार महिन्यांच्या काळात प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयाच्या योजना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे राबविल्या जात आहेत. या रुग्णालयात मोफत उपचारही दिले जात आहेत. तरीही मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात खासगी दवाखान्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. या काळात योग्य काळजी घेतल्याने पनवेल महापालिका हद्दीत ४ हजार ९२४ बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे. यात कोरोनाची लागण कोणालाही झालेली नाही. दवाखान्यात माता प्रसूतीसाठी आल्यापासून ते घरी जाईपर्यंत कोरोना काळात नियमाचे सर्व पालन केल्यामुळे हे शक्य झाले आहे.कोरोनाची धास्ती1गरोदर मातांवरील उपचार, तसेच प्रसूतीसाठी शासकीय, तसेच खासगी दवाखान्यात घेऊन जाणे खूप जिकिरीचे झाले होते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संखेमुळे मातेसह बाळाला कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.2परंतु मार्चपासूनच्या लॉकडाऊन काळात योग्य नियमाचे पालन करण्यात आले. त्यामुळे बाळ आणि बाळांतिणी आपापल्या घरी सुखरूप पोहोचल्या आहेत. डॉक्चरांनीही त्यांची अत्यंत योग्य काळजी घेतल्याने आतापर्यंत कोणत्याही गरोदर मातेला कोरोनाची लागण झाली नाही. 

टॅग्स :panvelपनवेल