लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये ४ हजार ९२४ बाळांचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:53 AM2020-08-02T01:53:25+5:302020-08-02T01:53:48+5:30

सुखरूप प्रसूती । शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयाचा आधार

4 thousand 924 babies born in Panvel during lockdown | लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये ४ हजार ९२४ बाळांचा जन्म

लॉकडाऊन काळात पनवेलमध्ये ४ हजार ९२४ बाळांचा जन्म

Next

अरुणकुमार मेहत्रे ।

कळंबोली : लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर, येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार, येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार, प्रसूती एमजीएम रुग्णालय कामोठे येथील रुग्णालयात केले जात आहे. त्यानुसार, पनवेल पालिका हद्दीत कोरोना काळात शासकीय रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयात ४ हजार ९२४ बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णांसाठी महापालिका क्षेत्रात ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चार महिन्यांच्या काळात प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयाच्या योजना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे राबविल्या जात आहेत. या रुग्णालयात मोफत उपचारही दिले जात आहेत. तरीही मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात खासगी दवाखान्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. या काळात योग्य काळजी घेतल्याने पनवेल महापालिका हद्दीत ४ हजार ९२४ बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे. यात कोरोनाची लागण कोणालाही झालेली नाही. दवाखान्यात माता प्रसूतीसाठी आल्यापासून ते घरी जाईपर्यंत कोरोना काळात नियमाचे सर्व पालन केल्यामुळे हे शक्य झाले आहे.

कोरोनाची धास्ती
1गरोदर मातांवरील उपचार, तसेच प्रसूतीसाठी शासकीय, तसेच खासगी दवाखान्यात घेऊन जाणे खूप जिकिरीचे झाले होते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संखेमुळे मातेसह बाळाला कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
2परंतु मार्चपासूनच्या लॉकडाऊन काळात योग्य नियमाचे पालन करण्यात आले. त्यामुळे बाळ आणि बाळांतिणी आपापल्या घरी सुखरूप पोहोचल्या आहेत. डॉक्चरांनीही त्यांची अत्यंत योग्य काळजी घेतल्याने आतापर्यंत कोणत्याही गरोदर मातेला कोरोनाची लागण झाली नाही.
 

Web Title: 4 thousand 924 babies born in Panvel during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल