नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीसांकडून मान्य
By कमलाकर कांबळे | Updated: October 9, 2025 10:14 IST2025-10-09T10:13:54+5:302025-10-09T10:14:19+5:30
सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम; नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे फडणवीसांकडून मान्य
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. आता या नामकरणासाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात याबाबतची घोषणा झाली नसली तरी सरकारवर आमचा विश्वास आहे. नामकरणासाठी आणखी काही दिवस वाट पाहू, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने तीस दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर एक दिवसही थांबणार नाही. पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सायंकाळी सहा वाजता प्रसारित बातमीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख ‘डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा करण्यात आला. मात्र, कार्यक्रमात अशी कोणतीही घोषणा झाली नाही, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण झाल्याची प्रतिक्रिया आहे.
दाेघांनी एकमेकांना पाहिलेही नाही
राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद कार्यक्रमस्थळीही दिसून आला. दोघे एकमेकांकडे पाहत नसल्याचे उपस्थितांनी हेरले.