मोठा अनर्थ टळला! हार्बर मार्गावरील खारकोपर इथं लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:54 IST2023-02-28T10:05:11+5:302023-02-28T11:54:34+5:30

या घटनेमुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम झाला असून हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

3 local coaches derailed at Kharkopar on Harbor route | मोठा अनर्थ टळला! हार्बर मार्गावरील खारकोपर इथं लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले

मोठा अनर्थ टळला! हार्बर मार्गावरील खारकोपर इथं लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले

नवी मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावर आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. बेलापूर ते खारकोपर लोकलचे ३ डबे खारकोपर स्थानकात रुळावरून घसरले. सकाळी ८.४६ मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना इजा झालेली नाही. घटनास्थळी मदतीसाठी बचाव पथकाची वाहने दाखल झाली असून डबे हटवण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, या घटनेमुळे बेलापूर-खारकोपर-नेरुळ या मार्गावरील लोकल गाड्यांवर परिणाम झाला असून हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मात्र हार्बर मार्गावरील इतर गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत अशी माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. 

Web Title: 3 local coaches derailed at Kharkopar on Harbor route