शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वर्षभरात रस्ते अपघातात २५० जणांचा मृत्यू; ४९५ प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:30 AM

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे. मात्र, काही मोठ्या अपघातांमुळे मृत्यूच्या संख्येत १९ ने वाढ झाली आहे.शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अतिवेगात वाहन चालवणे, अशा प्रकारांमुळे २०१७ मध्ये एकूण १२७२ अपघात घडले होते, त्यामध्ये सायन-पनवेल मार्गावरील नव्या उड्डाणपुलाच्या डांबरीकरणातील त्रुटीमुळे घडलेल्या अपघातासह पनवेल, उरण मार्गाच्या दुरवस्थेमुळे घडलेल्या गंभीर अपघातांचा समावेश होता. त्या ठिकाणी घडलेले बहुतांश अपघात पावसाळा दरम्यानचे आहेत. मात्र, २०१८ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण घटावे, यासाठी पोलिसांनी वर्षभर विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले, त्यामध्ये संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची डागडुजी करून घेण्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती अभियानांचाही समावेश होता. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईच्याही मोहिमा राबवण्यात आल्या. परिणामी, चालकांमध्ये बºया प्रमाणात जनजागृती झाल्याने तसेच रस्त्यांच्या परिस्थितीत सुधार घडू लागल्याने २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांच्या संख्येत १५४ ने घट झाली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या एकूण १२७२ अपघातांपैकी २२३ प्राणांतिक अपघातांमध्ये २३१ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गतवर्षी एकूण १११८ अपघात घडले असून, त्यापैकी २३९ प्राणांतिक अपघातात २५० जणांना मृत्यूने कवटाळले आहे. त्यापैकी काही अपघात सायन-पनवेल मार्गावरील तसेच उरण मार्गावरील खड्ड्यांमुळे घडलेले आहेत. वर्षाखेरीस रस्ते सुरक्षा समितीने सातत्याने अपघात घडणाºया ठिकाणांना ब्लॅक स्पॉट घोषित करून त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यामध्ये वाशी खाडीपुलाचाही समावेश होता. वर्षाखेरीस अपघातसदृश ठिकाणांवर दुरुस्तीकामे झाल्यानेही अपघातांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे.बहुतांश अपघातांना रस्त्याच्या दुरवस्थेसह वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. या दोन्ही बाबींमध्ये सुधार घडवण्याच्या उद्देशाने विद्यमान आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांसह दोन्ही परिमंडळाच्या पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यामुळे किरकोळ अपघातांनाही आळा बसला असून, २०१७ च्या तुलनेत गतवर्षी किरकोळ अपघातांच्या घटना १८३ ने कमी झाल्या आहेत. सायन -पनवेल मार्गावरील पुलांच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक नसल्यानेही अपघात घडले आहेत. त्यामध्ये सानपाडा, घणसोली, शिरवणे, सीबीडी आदी ठिकाणच्या पुलांचा समावेश आहे.वाशीत टेम्पोचा अपघातवाशीत टेम्पो दुभाजकाला धडकल्याची घटना सोमवारी रात्री वाशी सेक्टर १७ तेथे घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांना आढळून आले. सुदैवाने या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. अन्यथा, टेम्पोचालकाच्या हलगर्जीमुळे इतरांना मृत्यूच्या दाढेखाली जावे लागले असते. याचदरम्यान, पामबीच मार्गावर नेरुळ येथे रिक्षाने बॅरिकेड्सला धडक दिल्याने अपघात झाला. सदर ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून बॅरिकेड्स लावल्याचे रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले नाही, यामुळे त्याने बॅरिकेड्सला धडक दिल्याने हा अपघात झाला असून, त्यामध्ये प्रवाशासह रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.रेल्वे अपघातात २५१ बळीशहरातील ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावर रेल्वेच्या धडकेने तसेच रेल्वेतून पडून वर्षभरात २५१ जणांचा बळी गेला आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांकडून दरवाजात उभे राहण्याला पसंती दिली जाते. गर्दीच्या वेळी त्यांची ही हौस जीवावर बेतल्याचे अनेक अपघातांमधून समोर आलेले आहे, तर रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असतानाही अनेक ठिकाणी प्रवासी रुळावरून चालत स्थानकात जाताना दिसतात. परिणामी, अशांना रेल्वेच्या धडकेने मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. त्यानुसार गतवर्षी रेल्वे रुळावर झालेल्या मृतांमध्ये १७९ अपघात वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील आहेत. त्यामध्ये हार्बर मार्गावरील सीवूड ते गोवंडीपर्यंतच्या स्थानकांचा व ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी ते रबाळेपर्यंतच्या स्थानकांचा समावेश आहे. तर ७२ अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीतील असून, त्यामध्ये बेलापूर ते पनवेल व कळंबोलीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नागरिकांकडून रेल्वे रुळ ओलांडला जाऊ नये, याकरिता अनेक ठिकाणी रुळावर पादचारी पूल उभारण्याचेही काम सुरू आहे; परंतु रेल्वे प्रवाशांकडून शॉर्टकटला अधिक पसंती मिळत असल्याने हाच शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.

टॅग्स :Accidentअपघात