उरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:10 IST2018-10-25T00:09:42+5:302018-10-25T00:10:35+5:30
उरण नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

उरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान
उरण : उरण नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
उरण नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान रक्कम दीपावली सणापूर्वी मिळावी, अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष अॅड सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांनी केली होती.
बुधवाारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार रक्कम २५ हजार सानुग्रह अनुदान उरण नगरपरिषद कर्मचाºयांना देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सदर निर्णयाने नगरपरिषद कामगार कर्मचाºयांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण पसरले आहे. २५ हजारांचे हे सानुग्रह अनुदान एकमुखाने मंजूर केल्याबद्दल नगराध्यक्ष सायली म्हात्रे, गटनेते कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, तसेच सर्व
नगरसेवक, नगरसेविका यांचे कर्मचाºयांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.