पनवेलमध्ये विकासकामांसाठी २३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:55 IST2018-12-01T23:55:57+5:302018-12-01T23:55:59+5:30
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतच पार पडले.

पनवेलमध्ये विकासकामांसाठी २३ कोटींचा निधी
पनवेल: पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतच पार पडले. पनवेल शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था यामुळे दूर होणार आहे. शहरातील विकास कामांसाठी तब्बल २३ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटीतील गणेश मंदिर, संघिमत्र सोसायटी, राष्ट्रीय महामार्ग 4 ते धानसर गाव अशा तीन ठिकाणी कामांचे भुमिपूजन करण्यात आले.
महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर बनला आहे. ग्रामीण भागातील परिस्थितीही अशीच आहे. वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. पालिका क्षेत्रातील विकासासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागाची गरज लक्षात घेऊन अहवाल तयार केले पाहिजे. २३ कोटीच्या कामाचे उदघाटन आज होत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे हे यश असल्याचे यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.