शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माशांच्या हल्ल्यात 22 जखमी

By admin | Updated: October 11, 2014 22:50 IST

बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पात नाशिकहून ज्युनिअर इंजिनिअर म्हणून ट्रेनिंगसाठी आलेल्या 22 जणांवर आग्या माशांनी आकस्मिक हल्ला चढविला.

उरण : बोकडवीरा येथील जीटीपीएस प्रकल्पात नाशिकहून ज्युनिअर इंजिनिअर म्हणून  ट्रेनिंगसाठी आलेल्या 22 जणांवर आग्या माशांनी आकस्मिक हल्ला चढविला. या आकस्मिक हल्ल्यात 22 इंजिनिअर्स जखमी झाले आहेत. यामध्ये एक एक्झुक्युटिव्ह इंजिनिअर्ससह 8 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. त्यांना उपचारार्थ येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वावरील धोका टळला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे यांनी दिली.
उरण तालुक्यातील बोकडवारा येथे जीटीपीएम वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात नाशिकहून  प्रशिणार्थी 28 ज्युनिअर्स इंजिनिअर्स प्रशिक्षणासाठी आले आहेत. शनिवार (11) प्रशिक्षणार्थी बॉयलर प्लाण्टवर पाहणीसाठी चालले असता 5क् फूट उंचीवर असलेल्या आग्या माशांच्या मोहोळावरील हजारो माशांनी प्रशिक्षणार्थीवर हल्ला केला. 
या आग्या माशांच्या हल्ल्यात 22 प्रशिणार्थी जबर जखमी झाले. माशांच्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या 22 प्रशिणार्थीना येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना 24 तास वैद्यकीय अधिका:यांच्या  देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तातडीच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून सर्वावरील धोका टळला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनोज भद्रे यांनी दिली. 
माशांच्या हल्ल्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याचे वृत्त येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (वार्ताहर)