मनालीला गेलेले २०० विद्यार्थी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:05 IST2024-03-05T15:03:36+5:302024-03-05T15:05:18+5:30
नेरूळच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे सुमारे २०० विद्यार्थी मनाली येथे शैक्षणिक सहलीसाठी गेले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून तिथले हवामान बिघडल्याने मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचण होऊन चौघांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

मनालीला गेलेले २०० विद्यार्थी सुरक्षित
नवी मुंबई : मनाली येथे शैक्षणिक सहलीला गेलेले विद्यार्थी अडकल्याचा प्रकार घडला होता. मनालीमध्ये अति हिमवृष्टी झाल्याने विद्यार्थ्यांवर हा प्रसंग ओढवला होता. मात्र, सोमवारी तेथील परिस्थिती पूर्ववत आली असून, सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे महाविद्यालयाने कळवले आहे.
नेरूळच्या डी. वाय. पाटील कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रथम वर्षाचे सुमारे २०० विद्यार्थी मनाली येथे शैक्षणिक सहलीसाठी गेले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून तिथले हवामान बिघडल्याने मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचण होऊन चौघांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
हिमवृष्टीमुळे रस्ते बंद असल्याने अनेकजण आहेत त्या ठिकाणी अडकून पडले होते. परंतु, सोमवारी मनालीची परिस्थिती पूर्ववत झाली असल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे डी. वाय. पाटील व्यवस्थापनाने कळवले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेत असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.