आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 15:25 IST2020-04-22T15:24:44+5:302020-04-22T15:25:21+5:30

मुंबई ठाणेसह परराज्यातील कामगारांचा  समावेश 

19 people from IT company infected with corona, admitted to municipal hospital in vashi navi mumbai MMG | आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल

आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल

नवी मुंबई- ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील  आय टी कंपनीमधील 19 जणांना कोरोना ची लागण झाली आहे.  हे कामगार नवी मुंबई,  ठाणे, सांगलीसह इतर राज्यातील रहिवासी असून सर्वांना महानगरपालिकेच्या वाशी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
        
महापेमधील मिलेनियम बिझनेस पार्क परिसरातील कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. बँकिंग विषयीचे काम पाहणा-या कंपनीमधील तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  यामधील 7 कामगार नवी मुंबईमधील रहिवासी आहेत. मुंबई मधील 7, ठाणेमधील 2, सांगली, तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सदर कंपनी सील केली असून परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबईत एकाच ठिकाणी प्रथमच एवढे रूग्ण आढळले आहेत. सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन सर्वांची तत्काळ तपासणी करण्यात येणार आहे. सदर कंपनीमध्ये सर्व नियमांचे पालन केले जात होते का याचीही महानगरपालिका माहिती घेत आहे.  नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: 19 people from IT company infected with corona, admitted to municipal hospital in vashi navi mumbai MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.