शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी १८ कोटी

By admin | Updated: January 9, 2016 02:17 IST

ग्रामीण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला १८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला १८ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरातील आरोग्य सेवांवरील ताण कमी करण्यासाठी पनवेल तालुक्यात नव्याने सात नागरी आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पाच नागरी आरोग्य केंद्रांची डागडुजीही होणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आलेल्या निधीचे योग्य नियोजन करून जिल्ह्याच्या तळागाळात आरोग्य सुविधा पोचविण्याची जबाबदारी जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाला पेलावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर ११ कोटी ४४ लाख आणि जिल्हा रुग्णालयाच्या वाट्याला सहा कोटी ९७ लाख असे एकूण १८ कोटी ४२ लाख रुपये आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्याच गावामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत. विविध आजारांवर तातडीने उपचार मिळावेत, दैनंदिन लागणारी औषधे उपलब्ध व्हावीत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्याची सेवा-सुविधा पुरविताना पुरती दमछाक होते.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला चांगलाच आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्हा परिषद अथवा जिल्हा सरकारी रुग्णालये यांना नियमित येणाऱ्या निधीव्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण योजनेचा अधिकचा निधी प्राप्त होत असल्याने या निधीच्या माध्यमातून आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात यश येत आहे.विकासाच्या वाटेवर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील शहरी आरोग्य सुविधेवर ताण अधिकच वाढत आहे. त्यामुळे नगरपालिका हद्दीमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारण्याला सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार २०१५-१६ या कालावधीत एकट्या पनवेल तालुक्यात नव्याने सहा आणि खालापूर तालुक्यात एक नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.