झिम्बाब्वे- अमिरात प्रिव्‘ू

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:12+5:302015-02-18T23:54:12+5:30

अमिरातविरुद्ध झिम्बाब्वेचे पारडे जड

Zimbabwe-Emirates | झिम्बाब्वे- अमिरात प्रिव्‘ू

झिम्बाब्वे- अमिरात प्रिव्‘ू

िरातविरुद्ध झिम्बाब्वेचे पारडे जड

झिम्बाब्वेविरुद्ध संयुक्त अरब अमिरात
स्थळ : नेल्सन
सामन्याची वेळ : पहाटे ३.३० पासून
नेल्सन : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या लढतीत दमदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला उद्या गुरुवारी विश्वचषकात कमकुवत मानल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) विजय अपेक्षित असेल.
झिम्बाब्वे द. आफ्रिकेकडून ६२ धावांनी पराभूत झाला खरा पण त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली होती. ब गटाच्या या लढतीत झिम्बाब्वे संघात विश्वासाचा संचार झालेला दिसतो. यामुळे यूएईचे आव्हान मोडीत काढण्यास वेळ लागणार नाही. या गटातून द. आफ्रिका, भारत आणि पाक यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. चौथ्या संघासाठी आयर्लंड, विंडीज आणि झिम्बाब्वे यांच्यात चुरस असेल. आयर्लंडने विंडीजला धूळ चारल्यामुळे झिम्बाब्वेवरील दडपण वाढले. झिम्बाब्वेने विश्वचषकाच्या सराव सामन्यात लंकेला पाणी पाजले. द. आफ्रिकेचेही ८३ धावांत चार गडी बाद केले होते. डेव्हिड मिलर- डुमिनी यांनी नंतर २५६ धावांची नाबाद भागीदारी करीत ४ बाद ३३९ धावा उभारल्या. झिम्बाब्वे ४९ षटकांत २७७ पर्यंत मजल गाठू शकला.
या सामन्यात हॅमिल्टन मस्कद्जाने ८० आणि चामू चिभाभाने ६४ धावा ठोकल्या. अखेरचे पाच गडी ४१ धावांत बाद झाल्यामुळे घात झाला. १९८३ पासून नऊ वेळा विश्वचषकात सहभागी झालेल्या झिम्बाब्वेचा अनुभव अमिरातपेक्षा मोठा आहे. अमिरात संघ १९ वर्षानंतर विश्वचषकात पुन्हा सहभागी होत आहे. १९९६ साली त्यांनी नेदलॅन्डवर एकमेव विजयाची नोंद केली होती. सराव सामन्यात यूएईचा अफगाणिस्तानने १४ धावांनी पराभव केला.
मोहम्मद तौकीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अमिरात संघातील अनेक खेळाडू भारतीय किंवा पाकिस्तानी वंशाचे आहेत. सर्व खेळाडूंचा अनुभव लक्षात घेतला तरी केवळ ७१ सामन्यांचा अनुभव असलेल्या या संघाला शिकण्यासारखे बरेच काही असेल.(वृत्तसंस्था)
.........................................................................

Web Title: Zimbabwe-Emirates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.