शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू जिल्हा परिषद कर्मचारी संस्था : १२ ला माघार, खलबते, बैठकांना ऊत

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी प्रतिष्ठेच्या असणार्‍या कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. या ठिकाणी सत्ताधारी पावन गणेश मंडळाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालक, इच्छुकांसोबत सत्तेसाठी बोलणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात १२ तारखेला माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी प्रतिष्ठेच्या असणार्‍या कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. या ठिकाणी सत्ताधारी पावन गणेश मंडळाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालक, इच्छुकांसोबत सत्तेसाठी बोलणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात १२ तारखेला माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. दोन पंचवार्षिकपासून या ठिकाणी पावन गणेश मंडळाचे वर्चस्व आहे. यंदा संस्थेच्या दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे काम सुरू आहे. यामुळे यंदा निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सामान्य सभासदांची मागणी आहे. या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यास त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. संस्थेचे लाखो रुपये आणि कर्मचार्‍यांतील संघर्ष टाळता येणार आहे.
यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील प्रमुखांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, घोडे हे जागावाटपावर अडले आहे. या संस्थेत २ हजार ८४८ सभासद आहेत. यात सर्वाधिक आरोग्य संवर्गातील, त्या खालोखाल शिपाई आणि लिपिक संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. उर्वरितमध्ये पशूधन पर्यवेक्षक, तांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक या संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
या सर्व संवर्गातील नेते आपआपल्या मध्यस्थांमार्फत सत्ताधार्‍यांसोबत वाटाघाटीत गुंतले आहेत. मुख्यालयातील दोन जागा आणि अन्य तालुक्यांच्या काही जागांवर बोलणी अडली असून रविवारपर्यंत यातून मार्ग निघेल, असा विश्वास सत्ताधारी गटाला आहे. सध्या संस्थेच्या अद्ययावत दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे काम सुरू आहे. तसेच संस्थेचे कामकाज ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या प्रशासन विभागाकडून देण्यात आली. गुरूवारी माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे.
..................
संस्थेच्या हितासाठी सर्वांना सोबत घेवून संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू आहे. माघारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. संस्थेचा आणि सभासदांचा विचार करून सर्व इच्छुक सहकार्य करतील.
- सुभाष कराळे, पावन गणेश मंडळ.
......................
सोसायटी निवडणुकीत नवीन सभासदांना संचालकपदाची संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, सत्ताधारी त्याच त्या चेहर्‍यांना समोर आणत आहेत. ही बाब तरूण, नवीन सभासदांना रुचणार नाही. याचा विचार सत्ताधार्‍यांनी करणे आवश्यक आहे.
- शशिकांत रासकर, जि.प. कर्मचारी युनियन, सचिव.
...................