शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकचं भारतीयांना खुंल पत्र

By admin | Updated: September 11, 2016 00:20 IST

मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे

- ऑनलाइल लोकमत 
नवी दिल्ली, दि. 10 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकने भारतीयांना उद्देशून खुल पत्र लिहिलं आहे. मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे. झाकीर नाईक तपास यंत्रणांच्या रडारवर असून तरुणांना दहशतवादी होण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 
 
शातंता आणि एकता भंग करण्यासाठी सरकार मला आरोपी ठरवत आहे. मला दहशतवादाची शिकवण देणारा असं का म्हटलं जात आहे ? असा सवाल झाकीर नाईकने सरकारला विचारला आहे. मला सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून जाणुनबुजून टार्गेट केलं जात आहे. माझ्याविरोधात कोणताच पुरावा मिळाला नसताना सरकार माझ्याविरुद्ध अहवाल तयार करतं आणि तोच अहवाल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जातो असा आरोप झाकीर नाईकने केला आहे.
 
माझ्याविरोधात जाणुनबुजून कट रचला जात आहे. मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. याला भारताचा असहिष्णू चेहराच म्हणावा लागेल असं झाकीर नाईक बोलला आहे. 
 
झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली होती. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली होती. 
 
झाकीर नाईकच्या ' इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' (आयआरएफ) या संस्थेकडून 'राजीव गांधी  फाऊंडेशन'ला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त ' टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. २०११ साली 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन'  ही देणगी देण्यात आली असून आयआरएफनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देणगी म्हणून देण्यात आलेली ही रक्कम स्वीकारली असली तरीही आयआरएफने ही रक्कम 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला नव्हे तर 'राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट'ला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.