Ranveer Allahbadia : बुडता बुडता वाचलो... यूट्युबर रणवीर अलाहबादियाने सांगितला गोव्याच्या समुद्रातील थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:21 IST2024-12-26T10:20:41+5:302024-12-26T10:21:08+5:30

Ranveer Allahbadia : YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादियाने त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे.

YouTuber Ranveer Allahbadia, girlfriend rescued from drowning in Goa | Ranveer Allahbadia : बुडता बुडता वाचलो... यूट्युबर रणवीर अलाहबादियाने सांगितला गोव्याच्या समुद्रातील थरार

Ranveer Allahbadia : बुडता बुडता वाचलो... यूट्युबर रणवीर अलाहबादियाने सांगितला गोव्याच्या समुद्रातील थरार

YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादियाने त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे. यावेळी त्याची गर्लफ्रेंड देखील त्याच्यासोबत होती. गोव्याच्या समुद्रातील थरार त्याने सांगितला आहे. एक आयपीएस अधिकारी आणि त्याच्या आयआरएस पत्नीने त्याला बुडण्यापासून वाचवलं. "आम्ही आता पूर्णपणे बरे आहोत" असं रणवीर अलाहबादियाने सांगितलं आहे. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने याबाबत पोस्ट केली आहे. रणवीरने त्याला आणि गर्लफेंडला वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले आहेत. "आम्ही आता पूर्णपणे बरे आहोत. पण काल ​​संध्याकाळी ६ वाजता मी आणि माझी गर्लफ्रेंड एका प्रसंगातून थोडक्यात वाचलो आहोत. आम्हाला दोघांनाही समुद्रात पोहायला आवडतं. मी तर हे लहानपणापासून हे करत आहे. पण काल ​​आम्ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलो."

"माझ्यासोबत यापूर्वीही असं घडलं आहे परंतु तेव्हा माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं. एकटं पोहणं खूप सोपं आहे. पण आपल्यासोबत असलेल्या एखाद्या व्यक्तीला बाहेर काढणं खूप कठीण आहे. ५-१० मिनिटांच्या स्ट्रगलनंतर, आम्ही मदतीसाठी हाक मारली आणि जवळच पोहणाऱ्या ५ जणांच्या कुटुंबाने आम्हाला लगेचच वाचवलं. आम्ही दोघंही खूप चांगले स्विमर्स आहोत पण निसर्गाचा प्रकोप असा आहे की, तो कधीतरी तुमच्या मर्यादांची परीक्षा घेईल."


"आम्ही दोघेही पाण्यामध्ये वाचण्यासाठी धडपड करत होतो. भरपूर पाणी माझ्या तोंडात गेलं होतं. तेव्हाच मी मदतीसाठी ओरडायचं ठरवलं. आम्हा दोघांना वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी पती आणि आयआरएस अधिकारी पत्नीच्या कुटुंबाचे मनःपूर्वक आभार. या अनुभवाने आम्ही दोघंही ब्लँक आणि ग्रेटफूल आहोत. संपूर्ण घटनेत देवाने आमचं संरक्षण केलं असं आम्हाला वाटतं."

"आज ख्रिसमस साजरा करत असताना, आम्ही जिवंत असल्याबद्दल कृतज्ञ आहोत. या एका अनुभवाने जगण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे असं वाटतं. हे लिहितोय कारण मी नेहमीच असे क्षण तुम्हा सर्वांसोबत शेअर केले आहेत. हे वाचणाऱ्या तुमच्यापैकी प्रत्येकाला मनापासून धन्यवाद. काल संध्याकाळी, मी माझ्या भावाला @brother.salvador ला कॉल करून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना सांगण्याचा निर्णय घेतला. त्याने आमच्यासाठी प्रार्थना केली. माझ्यासाठी गोव्याची सुट्टी संस्मरणीय ठरली. मला वाटतं की २०२५ हे पूर्वीपेक्षा अधिक चांगलं असणार आहे" असं रणवीर अलाहबादियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: YouTuber Ranveer Allahbadia, girlfriend rescued from drowning in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.