शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
3
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
4
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
5
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
6
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
7
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
9
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
10
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
11
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
12
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
13
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
14
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
15
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
16
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
17
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
18
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
19
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

Abhiyuday Mishra Dies : प्रसिद्ध YouTuber अभ्युदय मिश्राचा अपघाती मृत्यू, दुचाकीवरून करत होता मध्य प्रदेशचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 19:56 IST

YouTuber Abhiyuday Mishra dies : मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूबर अभ्युदय मिश्रा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर बाईक घेऊन गेला होता.

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि गेमर अभ्युदय मिश्रा (YouTuber Abhiyuday Mishra Aka SkyLord) याचा बाईकिंग टूर दरम्यान रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या जगात अभ्युदय मिश्राला 'स्कायलॉर्ड' म्हणून ओळखले जात होते. अभ्युदय मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूबर अभ्युदय मिश्रा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर बाईक घेऊन (बाईकिंग टूर) गेला होता. त्याने या टूरला 'एमपी टुरिझम रायडिंग टूर' असे नाव दिले होते. यादरम्यान नर्मदापुरम-पिपरिया राज्य महामार्गावर सोहागपूरजवळ त्याचा अपघात झाला. एका ट्रकने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अभ्युदय मिश्रा जबर जखमी झाला. त्याना भोपाळच्या बन्सल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.

अभ्युदय मिश्राची ही टूर मध्य प्रदेश पर्यटन विभागाने स्पॉन्सर केली होती. युट्यूबर अभ्युदय मिश्राचा  सोहागपूरमध्ये अपघात झाला होता. या वृत्ताला मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. तसेच, पोलिसांनी यूट्यूबर अभ्युदय मिश्राला धडक देणाऱ्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, युट्यूबर अभ्युदय मिश्राची टूर 21 सप्टेंबर रोजी खजुराहो येथून सुरू झाली होती. तर भोपाळमध्ये 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी संपणार होती. पण, त्याआधीच युट्यूबर अभ्युदय मिश्राचा अपघात झाला.

युट्यूबवर जवळपास 14  लाख सबस्क्राइबर्स विशेष म्हणजे, अभ्युदय मिश्रा यांच्या स्कायलॉर्ड चॅनेलचे युट्यूबवर जवळपास 14  लाख सबस्क्राइबर्स आहेत. याशिवाय, अभ्युदय मिश्रा सोशल मीडियावरही खूप सक्रिय होता. इन्स्टाग्रामवर त्याला 3.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. फ्री फायर गेमशी संबंधित कंटेटसह त्याने YouTube करिअरची सुरुवात केली. त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्याचे लाखो चाहते त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल 'मराठी' वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशYouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया