प्रगत राष्ट्राचे दायित्व युवकांनी स्विकारावे - रणजित सावरकर
By Admin | Updated: May 11, 2014 19:34 IST2014-05-11T19:34:32+5:302014-05-11T19:34:32+5:30
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध आरंभदिनाला उजाळा

प्रगत राष्ट्राचे दायित्व युवकांनी स्विकारावे - रणजित सावरकर
१ ५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध आरंभदिनाला उजाळामुंबई : अनाम वीरांच्या स्मृती कायम ठेवून या हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लावण्यासाठी अखंड हिंदुस्थान व प्रगत राष्ट्र घडवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि युवा वर्गाने हे दायित्त्व स्विकारले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांनी ठरवलेल्या शिपायाच्या बंडाला स्वातंत्र्यसमर असल्याचे सिद्ध केले, त्या युद्धाचा आरंभ दिन १० मे १८५७ असून त्या निमित्ताने स्मारकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.या अभूतपूर्व स्वातंत्र्यलढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे फुंकली गेली. मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहतावणव्याचे रुप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आले असले तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फुलले. झाशीची राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा ज़फर, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या यांच्या स्मृती आपण कायम राखल्या पाहिजेत, असे सावरकर म्हणाले. (प्रतिनिधी)............................युद्ध ग्रंथाची मूळ प्रत पाहण्यासाठी गर्दीस्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध या ग्रंथाची मूळ प्रत पाहण्यासाठी स्मारकात ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे स्वातंत्र्य युद्धाची पहिली ठिणगी जगापुढे आली आणि त्यातून अनेक सशस्त्र क्रांतिकारक उदयास आले व त्यांनी आपापल्या परीने भारतमातेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीरांच्या या संशोधनपर ग्रंथावर ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली होती. मात्र महाप्रयासाने त्याचे मुद्रण झाले. नंतरच्या काळात ही त्यांनी लिहलेली ही मूळ प्रत स्मारकाकडे आली असून तिचे योग्य प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे. ही प्रत पहावयास मिळाल्यामुळे स्मारकात येणार्यांच्या चेहर्यावर एकच आनंद व देशभक्तीची भावना उमटून आली...................