भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात युवक कॉँग्रेसची पदयात्रा
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30
नाशिकपासून शुभारंभ : हिम्मत सिंग यांची माहिती

भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात युवक कॉँग्रेसची पदयात्रा
न शिकपासून शुभारंभ : हिम्मत सिंग यांची माहितीनाशिक : केंद्र सरकारने शेतकरीविरोधात भूमिअधिग्रहण कायदा संमत करण्याचा प्रयत्न चालविला असून, या कायद्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसच्या वतीने देशात पदयात्रा काढून शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात शंभर दिवसांच्या पदयात्रेचा शनिवारी (दि. १३) घोटी (ता. इगतपुरी) येथून शुभारंभ होणार असल्याची माहिती अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस हिम्मत सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यभर ही पदयात्रा शंभर दिवस चालणार असून, रविवारी (दि. १४) ही पदयात्रा नाशिकला येणार आहे. महाराष्ट्र राज्यभर चालणार्या भूमिअधिग्रहण कायद्याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती हाण्यासाठी काढण्यात येणार्या या पदयात्रेचा शुभारंभ १३ जूनला घोटी येथे सकाळी होणार आहे. या शुभारंभाच्या कार्यक्रमास अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे सचिव ऋतिक जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नाशिक लोकसभा अध्यक्ष राहुल दिवे आदिंसह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नाशिकहून ही पदयात्रा पुढे जालना जिल्ात जाणार असून, त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर असा पदयात्रेचा कार्यक्रम राहणार आहे. या पदयात्रेत शेतकर्यांमध्ये भूमिअधिग्रहण कायद्याबाबत माहिती व जनजागृती प्रत्यक्ष पदयात्रेतून व फलक व पत्रकाद्वारे करण्यात येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. या पदयात्रेच्या समारोपासाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना बोलावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, नाशिक लोकसभा अध्यक्षराहुल दिवे, नाशिक युवक कॉँग्रस अध्यक्ष स्वप्नील पाटील, भरत टाकेकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)