शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

AI Summit मध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन, भारत मंडपममध्ये कपडे काढून मोदींविरोधात केली घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:26 IST

Youth Congress protest at AI Summit: युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडत प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या एआय समिटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर देशविदेशातील पाहुण्यांसमोर शर्ट काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली.

राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय समिटमध्ये आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्था तोडत प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या एआय समिटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर देशविदेशातील पाहुण्यांसमोर शर्ट काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'पीएम इज कॉम्प्रमाईज्ड' अशा घोषणा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

एआय समिटमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमांसाठी देश-विदेशातून आलेले अनेक दिग्गज आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी भारत मंडपमध्ये उपस्थित होते. त्यावेळी युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते फलक घेऊन कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी पोहोचले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपले कपडे काढत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पीएम इज कॉम्प्रमाईज्ड अशा घोषणा युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते देत होते. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी या कार्यकर्त्यांना पकडून ताब्यात घेतले आणि तातडीने कार्यक्रम परिसरातून बाहेर काढले. 

याबाबत दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, एआय समिटमध्ये आंदोलन केल्या प्रकरणी युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच एवढा कडेकोट बंदोबस्त असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलक कार्यक्रमस्थळी कसे काय आले, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी