शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, भाजपा आमदार बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:43 IST

हैदराबादमधील भाजपा आमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

भोपाळ- हैदराबादमधील भाजपाआमदार टी राज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत, असं वाद ओढावणारं विधान त्यांनी केलं आहे. आरएसएस एक अशी फॅक्टरी आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे आयकॉन तयार करते. मध्यप्रदेशात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार टी राजा सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. 

तुम्ही सगळ्यानी लवकरच तुमच्या जवळच्या आरएसएसच्या शाखेशी सलग्न व्हा, असं मी आवाहन करतो. जो कुणी हिंदून आरएसएसमध्ये सहभागी होत नाही तो एक सच्चा हिंदू नाही. तसंच तो राष्ट्राची सेवा करण्यासाठी असमर्थ आहे, असं भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी म्हंटलं. 

भारतात राहणाऱ्या कुठल्याही धर्माच्या व्यक्तीने भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हंटलंच पाहिजे, नाहीतर ते देश सोडून जाण्यासाठी स्वतंत्र आहेत, असंही टी राजा यांनी म्हंटलं. दुनियेतील कुठलाही देश त्याच्या दुश्मन देशाची किंवा दहशतवाद्यांची प्रशंसा करू शकत नाहीत, असंही ते म्हणाले. 

इतर कुठलाही देश भारत मात की जय सहन करू शकत नाही पण भारतात असे लोक आहेत जे पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देतात व अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांची प्रशंसा करतात, असंही वक्तव्य टी राजा यांनी केलं आहे. जर हिंदूना समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल, तर त्यांनी लव्हजिहादच्या विरोधात जागरूकता निर्माण करावी, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ