शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"जो डोळे वटारत होता कटोरा घेऊन फिरतोय! तुमची इच्छा होती..., मोदीनं पूर्ण केली"; पंतप्रधानांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 17:02 IST

"मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे.'

गेल्या 10 वर्षात एनडीए सरकारने अशा गोष्टी केल्या आहेत, ज्या पूर्वी अशक्य मानल्या जात होत्या. आज प्रत्येकजण म्हणत आहे, मोठी कामे करण्याची ताकद केवळ भाजपमध्ये आहे. पूर्वी शेजारचे देश हल्ले करून निघून जायचे. सीमेवर अशांतता होती. लोकांना दुःखासोबतच संतापही व्यक्त करत होते. यांच्या घरात घुसून मारायला हवे, असे तुम्हाला वाटत होते. मोदीने तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी बिहारमधील पूर्णिया येथे एका प्रचार सभेला संबोधित करत होते. 

'भारत तोडणाऱ्यांच्या मनसुब्याला आग लागली' -'तुमची इच्छा होती की काश्मीरमधून 370 हटायला हवे. मात्र, 370 हटवल्यास काश्मीरात आग भडकेल, असे अहंकारी आघाडीवाले म्हणत होते. आज कलम 370 हटले आहे आणि काश्मिरात नाही, तर भारताला तोडू इच्छिणाऱ्यांच्या मनसुब्यांना आग लागली आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. 

हा मोदी आहे, ना भितो, ना झुकतो -मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती. तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना भितो, ना झुकतो.

देशातील 25 कोटी लोक गरिबीतून तेव्हा बाहेर आले... -मोदी पुढे म्हणाले, 'देशातील 25 कोटी लोक गरिबीतून तेव्हा बाहेर आले, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम केले. देशातील 4 कोटी गरीब लोकाना पंतप्रधान आवास तेव्हा मिळाले, जेव्हा तुम्ही मोदींना सेवा करण्याचा आशीर्वाद दिला. भाजपने पुढील 5 वर्षांसाठी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात मोदीची गॅरंटी आहे. भविष्यातही देशातील सर्व गरजूंना गरीबांना मोफत रेशन मिळेल. गरीब, दलित आणि वंचितांसाठी केलेल्या योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवल्या जातील. एवढेच नाही, तर सरकार 3 कोटी नवी पक्की घरेही बांधणार आहे.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेस