शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...तर तुमचे आधार कार्ड ठरेल निरुपयोगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 6:26 PM

केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर ...

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने बहुतांश व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य ठरवले आहे. त्यामुळे आधारकार्ड हे आवश्यक बनलेले आहे. मात्र तुमचे आधार कार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी ठरू शकते. तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर तुमच्या आधार कार्डचा क्यूआर कोड काम करणे बंद करेल. तसेच आधार कार्डमधील तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. यूआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणाऱ्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. आधार कार्डला लॅमिनेशन करून ठेवले असेल किंवा प्लॅस्टिक कार्डचा वापर करण्यात येत असेल तर आधार कार्डमधील तुमची गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते अशी भीती यूआयडीएआयने व्यक्त केली आहे. आधार कार्डचा एक वेगळा भाग आणि मोबाइल आधार पूर्णपणे वैध असल्याचेही यूआयईएआयने सांगितले. आधार स्मार्टकार्डच्या प्रिंटींगवर 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अनावश्यक असल्याचे यूआयईडीएआयचे म्हणणे आहे.  प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी स्मार्ट कार्ड अनावश्यक असतात. त्यामुळे क्विक रिस्पॉन्स कोड काम करणे बंद करते. तसेच या प्रकारच्या अनधिकृत प्रिंटिंगमुळे क्यूआर कोड काम करणे बंद करू शकते.  वरील कारणांशिवाय तुमच्या मंजुरीशिवाय चुकीच्या व्यक्तींकडे तुमची माहिती जाऊ शकते, अशी माहितीही आधार एजन्सीकडून देण्यात आलेली आहे. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे म्हणाले की, प्लॅस्टिकचे आधार स्मार्ट कार्ड पूर्णपणे अनावश्यक आणि निरर्थक आहे. मात्र सर्वसाधारण कागदावर डाऊनलोक करण्यात आलेले आधार कार्ड किंवा मोबाईल आधार कार्ड मात्र वैध असेल.  आता तुमचा चेहरा बनणार आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे.1 जूनपासून नवी सोय‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व ‘आधार’ संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल. थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकार