भयंकर! विवाहीत महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाला जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:01 IST2018-12-04T11:58:15+5:302018-12-04T12:01:43+5:30
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

भयंकर! विवाहीत महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाला जिवंत जाळलं
पाटणा - बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. रविवारी ओरलहिया गावात ही घटना घडली. श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणचे एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र गावातील दुसऱ्या एका विवाहीत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे श्रवणने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून विवाहीत महिलेशी पळून जावून लग्न केलं होतं. काही दिवस ते दोघेही फरार होते. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा गावात परतले आणि पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती.
श्रवणने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक नाराज झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी श्रवणला बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रवणच्या भावाने 15 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.