बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांनी केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 23:42 IST2025-12-22T23:33:27+5:302025-12-22T23:42:37+5:30
Telangana Crime News: तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील मुसेपेट भागात एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणानंतर या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांनी केला गंभीर आरोप
तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील मुसेपेट भागात एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणानंतर या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली असून, हा तरुण या तरुणीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार १७ डिसेंबर रोजी रात्री आरोपी तरुणाने मृत तरुणीला भेटण्यासाठी बोलावले होते. दोघांमध्ये आधीपासून ओळख होती. दरम्यान, भेटायला आल्यावर दोघांनीही वॉशरूममध्ये शरीरसंबंध प्रस्थापित केले. याचदरम्यान, ही तरुणी अचानक बेशुद्ध पडली. तिच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने इतर लोकांच्या मदतीने या तरुणीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच परिस्थितीचं गांभीर्य विचारात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय दंडविधानातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणी एससी/एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीस हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्याचं मानून पुढील तपास करत आहेत.