चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 06:38 PM2019-10-06T18:38:18+5:302019-10-06T18:43:39+5:30

देवबंदमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

young girl raped by former councilor deoband | चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Next

उत्तर प्रदेशः देवबंदमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करू न दिल्यास पीडितेच्या भावाची हत्या करेन, असंही त्या नराधमानं धमकी दिली होती. त्यानंतर लागलीच  पीडितनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंदर्भात तक्रार दिली. पीडितेच्या वैद्यकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधल्या देवबंदमध्ये घडली आहे. 

18 वर्षांच्या मुलीवर माजी सभासद असलेल्या आरिफनं गाफील ठेवून बोलावलं होतं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, आरिफ गुब्बारा आमच्या घरी आला आणि तुला काम देतो असं माझ्या कुटुंबीयांना त्यानं सांगितलं. माझ्या पत्नीची तब्येत खालावली आहे. आम्हाला घरकाम करणाऱ्या बाईची गरज आहे. त्यानंतर तो मला त्यांचा घरी घरकामासाठी घेऊन गेला. मी त्याच्या घरात गेल्यानंतर पाहिलं तर घरात कोणी नव्हतं. त्यानं मला बसायला सांगितलं. त्यानं पाणी दिलं आणि थोडे पैसेसुद्धा देऊ केले.

पैसे हातात ठेवल्यानंतर तो दुष्कृत्याचा प्रयत्न करू लागला. परंतु मी त्याला विरोध केला. त्यानंतर त्यानं चाकू काढला आणि माझ्या मानेवर ठेवला. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तुला ठार करेन, असे त्यानं सांगितलं. त्यानंतर एक मुलगा आला आणि त्यानं आरीफ माझ्याबरोबर दुष्कृत्य करत असल्याचा व्हिडीओ तयार केला. हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी घरी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यानं मला धमकी दिली.

त्यानं सांगितलं की, हा प्रकाराची कुठेही वाच्यता केलीस, तर तुझा हा व्हिडीओ व्हायरल करेन, व्हिडीओच्या नावाखाली सातत्यानं तो माझ्यासोबत बलात्कार करत राहिला. पुन्हा एकदा त्यानं व्हिडीओ देतो सांगून घरी बोलावलं आणि माझ्यावर बलात्कार केला, त्यानंतर काही दिवसांनी त्यानं मला जत्रेत बोलावलं आणि जंगलात घेऊन जाऊन माझ्यावर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला, असून पुढील तपास सुरू आहे

Web Title: young girl raped by former councilor deoband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.