तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:30 IST2024-09-30T13:30:07+5:302024-09-30T13:30:35+5:30
सुप्रीम कोर्टात एका घटस्फोट हस्तांतरीत याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी हे मत मांडले

तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
नवी दिल्ली - कौटुंबिक न्यायालयातील अनेक घटस्फोटाची प्रकरणे वर्षोनुवर्ष रखडत राहतात. त्यावरूनच सुप्रीम कोर्टात घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महिलेला अनोखा सल्ला दिला आहे. तुम्ही १० वर्ष केस लढत राहाल, कदाचित १० वर्षाहून अधिक काळ खटला चालेल आणि वकील खुश होतील त्यामुळे तुम्ही संमतीने घटस्फोट घेणे चांगले राहील असा सल्ला चंद्रचूड यांनी दिला आहे.
वैवाहिक विवाद प्रकरण हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी जोडप्याला परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला. सरन्यायाधीशांनी महिलेला विचारले की, तुमचं क्वॉलिफिकेशन काय आहे? त्यावर महिलेने सांगितले मी एमटेक आहे आणि अमेरिकेत पीचएडी केली आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी तु्म्ही कुठे जॉब करता असा प्रतिप्रश्न केला त्याला उत्तर देताना महिलेने मी नोकरी करत नाही असं सांगितले. तेव्हा तुम्ही इतक्या शिकलेल्या आहात, काहीतरी नोकरी करा असं कोर्टाने म्हटलं.
तुम्ही दोघांनी आपापसात सहमतीने घटस्फोट घेतलेला चांगला राहील. पुढे खटला सुरू राहिला तर क्रिमिनल तक्रारी आणि इतर गोष्टी उद्भावतील. तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं नसेल हे होऊ शकते. जर तुम्ही परस्पर संमतीने तोडगा काढला तर आम्ही हा खटला बंद करू शकतो. जर तुम्ही शिक्षित नसता तर गोष्ट वेगळी होती परंतु तुम्ही इतके क्वॉलिफाइड आहात तुम्ही सहजपणे नोकरी करू शकता असं कोर्टाने महिलेला सांगितले.