तुम्ही एक मशीद शहीद केली, आम्ही..; अयोध्या निर्णयाच्या 6 वर्षांनंतर ओवैसींची मोठी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:09 IST2025-11-24T19:08:41+5:302025-11-24T19:09:12+5:30
'लोक आम्हाला आमच्या देशभक्तीचे प्रमाणपत्र मागतात.'

तुम्ही एक मशीद शहीद केली, आम्ही..; अयोध्या निर्णयाच्या 6 वर्षांनंतर ओवैसींची मोठी प्रतिक्रिया
हैदराबाद: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रविवारी आयोजित सभेत बोलताना त्यांनी 2019 मधील अयोध्या निर्णयापासून ते अलिकडील दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापर्यंतची परिस्थिती मांडली. ओवैसी यांनी दावा केला की, माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली नाही, कारण तो बहुसंख्यांक समाजातील होता.
मुस्लिमांवर अन्याय...
ओवैसी म्हणाले, लोक मुस्लिमांना लक्ष्य करतात आणि आमच्या देशभक्तीचे प्रमाणपत्र मागतात. आम्ही अनेक अन्याय सहन केलेत, पुढेही करू, पण आम्ही कधीही आपल्या देशाचा तिरस्कार केला नाही. मुस्लिमांना दाबले तर भारत कमजोर होईल. तिरस्काराच्या नजरेतून मुस्लिमांकडे पाहिले, तर देशाचा विकास कसा होणार?
#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says, "...To those who abuse Muslims and demand a certificate of loyalty from us, we went through a lot and we will face a lot tomorrow as well, but we never hated our nation. We told the oppressors that we hate them and… pic.twitter.com/pjUJPvCouD
— ANI (@ANI) November 24, 2025
मुस्लिमाने कधी न्यायाधीशांवर बूट फेकला नाही...
ओवैसींनी माजी CJI गवईंवर बूट फेकण्याच्या घटनेचा उल्लेख करताना म्हटले की, अयोध्या प्रकरणाचा निर्णय आमच्या विरोधात होता. तरीही कोणत्याही मुस्लिमाने कोर्टामध्ये न्यायाधीशांवर बूट फेकला नाही. प्रत्यक्षात पूट फेकणाऱ्यावर जास्त कारवाई झालीच नाही, कारण तो बहुसंख्यांक समाजातील होता. भारतातील मुस्लिमांनी नेहमीच देशावर प्रेम केले आहे आणि कायम करत राहतील.
देशाचा शत्रू आमचा शत्रू
लाल किल्ल्याजवळ अलिकडेच झालेल्या कार बॉम्ब स्फोटावर ओवैसींनी कठोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शैक्षणिक संस्थांत बसून अमोनियम नायट्रेटचे बॉम्ब तयार करण्याचा कट रचणाऱ्यांची आम्ही तीव्र निंदा करतो. 14 लोक मरण पावले, त्यात हिंदू होते, मुस्लिमही होते. देशाचा शत्रू आमचा शत्रू आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says, "...We condemn anyone who sits in an educational institution and conspires to build bombs...14 people, including Hindus and Muslims, were killed (in Delhi blast). We should openly condemn all such people. Enemies… pic.twitter.com/cWylSr4RcF
— ANI (@ANI) November 24, 2025
तुम्ही एक बाबरी पाडा, आम्ही...
जे लोक मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छित आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे, तुम्ही संपाल, आम्ही संपणार नाही. आम्ही लोकशाहीच्या चौकटीत आमचा लढा चालू ठेवू. तुम्ही एक मशीद शहीद कराल, पण आम्ही लाखो मशिदी बांधू.