आप सरकारला पोलिसांचे पूर्ण सहकार्य- राजनाथसिंग सुरक्षेला प्राधान्य : राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास शक्य
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:44+5:302015-02-16T21:12:44+5:30
नवी दिल्ली : केजरीवाल सरकारला पूर्ण सहकार्य द्या असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

आप सरकारला पोलिसांचे पूर्ण सहकार्य- राजनाथसिंग सुरक्षेला प्राधान्य : राज्यांच्या विकासामुळेच देशाचा विकास शक्य
न ी दिल्ली : केजरीवाल सरकारला पूर्ण सहकार्य द्या असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दिल्लीत नवे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीच्या विकासासाठी मी पोलिसांच्या पूर्ण सहकार्याची अपेक्षा करतो, असे राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांच्या ६८ व्या स्थापनादिनाच्या पथसंचलन कार्यक्रमात म्हटले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो,राज्यांचा विकास झाल्याखेरीज देशाचा विकास शक्य नाही. सांघिक सहकार्यातून भारताला जागतिक शक्ती बनवायचे असेल तर पक्षभेद बाजूला सारत सर्व राज्यांना पूर्ण सहकार्य द्यायला हवे. हीच बाब पंतप्रधानांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे.-------------------महिलांवरील अत्याचारामुळे मोदी व्यथितदिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत केले जात असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. केवळ दिल्लीतील जनतेचीच बाब नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही महिलेबाबत गुन्हा घडला की व्यथित होतात. समाजविघातक घटकांकडून दिल्लीच्या विकासकामांमध्ये बाधा निर्माण केली जाऊ नये यासाठी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करावी. दिल्लीसारख्या वैविध्यपूर्ण शहरामध्ये सुरक्षेचे काम अतिशय अवघड ठरते. विविध आव्हाने असतानाही दिल्लीचे पोलीस चांगली कामगिरी बजावत आहेत, असे सांगत त्यांनी प्रशंसाही केली.-------------------------पोलिसांना प्रतिमा जपण्याचे आव्हान दिल्लीत वेगवेगळे समुदाय वास्तव्याला असून अगदी छोटी घटनाही राष्ट्रीय बातमी बनते. त्यापेक्षा मोठी घडामोड असेल तर आंतरराष्ट्रीय बातमी बनते. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. प्रतिमा जपण्यासाठी पोलीस दलाने सतर्कपणे काम करावे, असेही ते म्हणाले.