शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’च बाप!

By admin | Updated: February 11, 2015 06:34 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या भाजपाच्या दृष्टीने हा पराभव नियतीने घेतलेला सूडच म्हणावा लागेल. एक, म्हणजे ‘काँग्रेसमुक्त दिल्ली’चे त्यांचे स्वप्न साकार झाले, पण हे कर्तृत्व त्यांच्या हातून न घडता ते ‘आप’ने करून दाखविले. दुसरे असे की, दिल्लीची सत्ता काबीज करायला निघालेल्या भाजपाला ७०पैकी केवळ ३ जागा मिळाल्याने लाज राखणेही मुश्किल झाले. तिसरे असे की, मे महिन्यापासून चौखूर उधळलेल्या मोदी लाटेच्या वारूला ‘आप’च्या ‘झाडू’ने चारी मुंड्या चीत करून फेंफरे आणले! सर्वांत झोंबणारी गोष्ट अशी की, या निवडणुकीचा ‘फोकस’ मोदींपासून दूर राहावा म्हणून भाजपाने किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरविले. पण बेदींनाही त्यांना निवडून आणता आले नाही. लोकसभा निवडणुकीत ४४ जागा मिळालेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही न देणाऱ्या भाजपाच्या वाट्याला तीच नामुश्की दिल्ली विधानसभेत आली. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अघोषित उमेदवार अजय माकन हेही पडझडीत टिकाव धरू शकले नाहीत. पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.> दिल्लीत झालेल्या राजकीय भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) मोदी लाटेवर स्वार होऊन मस्तवाल झालेल्या भाजपाला धूळ चारत आणि शरपंजरी पडलेल्या काँग्रेसला पूर्णपणे नामशेष करीत राजधानीची सत्ता न भूतो अशा बहुमताने पुन्हा काबीज केली. गेल्या वर्षभराच्या राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी ‘पाच साल, केजरीवाल’ असा ठणठणीत कौल देत सर्वांचीच बोलती बंद केली.> संपूर्ण दिल्ली आपमयआम आदमी पार्टीने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण दिल्लीत ‘पाच साल केजरीवाल’चे नारे लागत होते. सर्व ठिकाणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जल्लोष करत होते.