योेगींनी गायत्री प्रजापतींच्या कुटुंबाला भेट नाकारली

By Admin | Updated: May 2, 2017 00:53 IST2017-05-02T00:53:23+5:302017-05-02T00:53:23+5:30

बलात्काराच्या आरोपावरून कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशचे

Yogi refused to visit Gayatri Prajapati's family | योेगींनी गायत्री प्रजापतींच्या कुटुंबाला भेट नाकारली

योेगींनी गायत्री प्रजापतींच्या कुटुंबाला भेट नाकारली

लखनौ : बलात्काराच्या आरोपावरून कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट नाकारली आहे. योगींनी आपल्या ५ कालिदास मार्ग या निवासस्थानी जनता दरबार भरविला होता. समाजवादी पक्षाचे नेते प्रजापती यांची पत्नी आपल्या दोन मुलींना घेऊन तेथे योगींना भेटण्यासाठी गेल्या असता त्यांनी भेट नकारली. त्यावेळी हजर असलेले मंत्री तुमचे गाऱ्हाणे ऐकून घेतील, असे आम्हाला सांगण्यात आले असे प्रजापती यांच्या पत्नी म्हणाल्या. माझ्या पतीला न्याय मिळेल, असा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. प्रजापती यांना विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन मंजूर केला होता.(वृत्तसंस्था)

Web Title: Yogi refused to visit Gayatri Prajapati's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.