शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ यांना अमित शाहांमध्ये दिसते या ४ महापुरुषांची छाप, सर्वांसमोर म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:02 IST

Yogi Adityanath & Amit Shah: योगी आदित्यनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वावर आचार्य चाणक्य, आदिगुरू शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसून येते

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. योगींनी अमित शाह यांच्याबाबत स्तुतिसुमने वाहिली आहेत. योगी आदित्यनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वावर  आचार्य चाणक्य, आदिगुरू शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसून येते.

योगी आदित्यनाथ यांनी हे विधान यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३ मध्ये उद्योगपतींना संबोधित करताना केले आहे. देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी लखनौमध्ये तीन दिवसीय समिटचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातूम उत्तर प्रदेशमध्ये २५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची अपेक्षा आहे. 

दरम्यान या समिटमधील कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले की,  अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आचार्य चाणक्यांच्या कुशल संघटनकर्त्याचे गुण, भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेचे उद्घोषक आदिगुरू शंकराचार्य यांची साधनाशक्ती, स्वातंत्र्यवीर सावररकांच्या देशभक्तीचं तेज आणि अंत्योदय, अमृतकाळाच्या विकासयात्रेचे व्हिजन असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाच्या गुणांचे समायोजन दिसते.

दरम्यान, अमित शाह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आहे. राज्यामध्ये गुंतवणूक आणि उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये व्यापक बदल झाला आहे. तो संपूर्ण देशासाठी शुभ आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होत नाही, तोपर्यंत आपला भारत देश खूप पुढे जाऊ शकणार नाही.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश