शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath Oath Ceremony : 'या' ठिकाणी होणार योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी; 1 लाख लोकांना बसता येणार, हेलिपॅडपासून 1000 वाहनांच्या पार्किंगची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:51 IST

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. होळीनंतर योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 21 मार्च रोजी शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी शपथविधीसाठी स्मृती उपवनऐवजी अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. स्टेडियममध्ये शपथ घेण्यामागचे कारण म्हणजे हा ऐतिहासिक विजय भव्य करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि मोठ्या संख्येने भाजप नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 37 वर्षांनंतर एका पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. अशा परिस्थितीत भाजप या ऐतिहासिक सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यात व्यस्त आहे.

भाजपने शपथविधीसाठी अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची निवड केली आहे, कारण येथे जवळपास एक लाख लोक सहज बसू शकतात. याशिवाय, या स्टेडियमच्या आवारात एक हजार चारचाकी आणि पाच हजार दुचाकी वाहने पार्किंग करता येतील.तसेच, गरज भासल्यास स्टेडियमच्या आवारात तात्पुरते हेलिपॅडही उभारले जाऊ शकते. स्टेडियमच्या आत 2 मोठ्या एलईडी स्क्रीन देखील आहेत, जेणेकरून शपथविधी थेट दाखवता येईल.

योगी आदित्यनाथ आज दिल्लीतमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपला 255 आणि सहयोगीपक्षांसह 273 जागा मिळाल्या आहेत. भाजपने यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून जाहीर केले आहे. अशाच मुख्यमंत्री निवडीच्या औपचारिक प्रक्रियेसाठी अमित शहा आणि रघुबर दास होळीनंतर लखनऊला येणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्लीत पोहोचणार असून, तेथे भाजप हायकमांडसोबत बैठक घेऊन मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश