शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता बनवणारी हिंदू युवा वाहिनी मोजतेय अखेरच्या घटका, अनेक पदाधिकारी सपामध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:02 IST

Hindu Yuva Vahini News: Yogi Adityanath यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या राजकाणार मोठी झेप घेतली आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांना कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून घडवणारी हिंदू युवा वाहिनी ही संघटना मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. तसेच या संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे समाजवादी पक्षात गेले आहेत. तर या संघटनेकडे लक्ष देणारा कुणीही उरलेला नाही. योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना २००२ मध्ये केली होती. राष्ट्रविरोधी कृत्यांना रोखणे हे या संघटनेचे उद्दीष्ट होते. २००७ मध्ये योगी आदित्यनाथ यांना ११ दिवस तुरुंगातही राहावे लागले होते. हिंदू युवा वाहिनीचे वर्चस्व आहे.

हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष असलेल्या सुनील सिंह आणि त्यांच्यासोबत सौरभ विश्वकर्मा, चंदन विश्वकर्मा यांनी १५ वर्षांपर्यंत हिंदुत्वाचा झेंडा हिंदू युवा वाहिनीने उचलून धरला होता. मात्र २०१७च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपादरम्यान त्यांचे योगी आदित्यनाथ यांच्याशी मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या बाहेर काढले होते. आता हे तिन्ही नेते समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत.

हिंदू युवा वाहिनीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ हे सीएम बनल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. हळुहळू जिल्हा कार्यकारिणी भंग करण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे समाजवादी पक्षात जाऊ लागले. या क्रमामध्ये २०१८ मध्ये उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, मऊ, आझमगड या जिल्ह्यांमधील कार्यकारिणी भंग करण्यात आल्या. या भागांमध्ये या संघटनेची भक्कम जाळे होते.  

 आरएसएसच्या आदेशांनुसार हिंदू युवा वाहिनीला भंग करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून या संस्थेच्या विस्ताराला ब्रेक लागला होता. तसेच समांतर हिंदुत्ववादी संघटना भविष्यात पक्षासाठी डोकेदुखी ठरली असती, त्यामुळे ही संघटना आटोपती घेण्यात आल्याची चर्चा आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाGorakhpurगोरखपूरHindutvaहिंदुत्व