yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda | गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

गोतस्करी आणि गुंडगिरी पश्चिम बंगालमधून हद्दपार करणार: योगी आदित्यनाथ

ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांची मालदा येथे जनसभातृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर टीकास्त्र'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार असल्याचा आरोप

मालदा :पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला आता वेग येऊ लागला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील मालया येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी गो-तस्करी, जय श्रीराम घोषणा, तृणमूलची गुंडगिरी, CAA अशा अनेक मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda)

पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा देण्यावरही बंदी घातली जात आहे. प्रभू श्रीरामांच्या घोषणेलाही बंदी घालणाऱ्या रामद्रोह्यांचे आता पश्चिम बंगालमध्ये काहीही काम राहिलेले नाही. बंगालमधील जनता शक्तीपूजक आहे. मात्र, दुर्गा पूजनावरही येथे बंदी घातली जाते. ईदच्या निमित्ताने गोहत्या केली जाते, अशी टीका करत भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर या सर्व गोष्टी बंद होतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

'सीएए'संदर्भात प्रायोजित हिंसाचार  

CAA वरूनही योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. 'सीएए'प्रकरणावर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार हा प्रायोजित होता, असा आरोप करत पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहाद प्रकरणी सरकारकडून काहीच कारवाई केली जात असल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केला. 

तृणमूलच्या गुंडांना हद्दपार करणार

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या गुंडांकडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात येतात. मात्र, ममता सरकारने त्याविरोधात काही कारवाई केली नाही. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल आणि २ मेनंतर तृणमूल काँग्रेसचे गुंड भीक मागत फिरताना दिसतील, असे निशाणा योगी आदित्यनाथ यांनी साधला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आठ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. आठही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावर २ मे रोजी मतमोजणी होईल. पश्चिम बंगालसह, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्याक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अलीकडेच जाहीर करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: yogi adityanath criticised mamata banerjee and trinamool congress at malda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.