योगेंद्र यादव यांची उचलबांगडी
By Admin | Updated: March 5, 2015 02:06 IST2015-03-05T02:06:38+5:302015-03-05T02:06:38+5:30
आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांची पक्षाच्या प्रमुख अशा राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) उचलबांगडी करण्यात आली आहे.

योगेंद्र यादव यांची उचलबांगडी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांची पक्षाच्या प्रमुख अशा राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) उचलबांगडी करण्यात आली आहे. यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी यादव यांना यापुढे पीएसीमध्ये न ठेवण्याचा निर्णय बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला. तत्पूर्वी कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधी केजरीवाल यांनी पक्षातील अंतर्गत कलहाला वैतागून संयोजकपदाचा राजीनामा दिला. मात्र तो पक्षाने स्वीकारलेला नाही.