शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

होय, तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडले म्हणून आम्ही ट्रेन सोडल्या; पंतप्रधान मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 06:17 IST

कोरोना पसरण्यास काँग्रेस दोषी असल्याचे खापर पंतप्रधान मोदी यांनी फोडल्यावर त्याला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई : केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रात जे लोक अडकून पडले होते, त्यांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी ट्रेन सोडल्या. महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीयांना परत जाण्याची सोय करून दिली. त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांनी आपल्या सीमा बंद करून ठेवल्या होत्या. महाराष्ट्रातून ज्या बसेस उत्तर प्रदेश बॉर्डरपर्यंत गेल्या तिथल्या लोकांचे बेहाल झाले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशची जनता भाजपला जाब विचारत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आरोप करण्यासारखा बेजबाबदारपणा दुसरा नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. 

मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आकडेवारीच दिली. ते म्हणाले, लोक स्वतःहून नियम मोडून स्टेशनवर गर्दी करत होते. रेल्वे बंद असल्यामुळे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना थाळ्या वाजवणे आणि दिवे लावण्याचे काम सांगत होते.

‘१२,१०,२५५ परप्रांतीय पाठवले आपापल्या घरी’१ मे ते ३१ जुलै २०२० या कालावधीत ८४२ रेल्वे सोडण्यात आल्या. त्यातून १२ लाख १० हजार २५५ परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात मूळ गावी सोडण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ९७ कोटी ७३ लाख ९४ हजार ८५० रुपये देण्यात आले.

‘कोरोनाकाळात मोदींनी देशाला सोडले वाऱ्यावर’कोरोना पसरण्यास काँग्रेस दोषी असल्याचे खापर पंतप्रधान मोदी यांनी फोडल्यावर त्याला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. कोरोनाकाळात मोदींनीच देशाला वाऱ्यावर सोडले, अशी टीका त्यांनी केली. निवडणुकांत अन्य मुद्दे मागे पडावेत, अपयश झाकले जावे, यासाठी हे आरोप सुरू आहेत. वेळीच साथीला आळा घालण्यात राज्ये नव्हे, तर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. 

पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य त्या पदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

अशोभनीय, आणि निखालस खोटे -मोदी यांचे आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि निखालस खोटे आहेत. ही जागतिक महामारी भारतात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार कोण? याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार काँग्रेसवर चुकीचे आरोप करत आहे, असा हल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

वडेट्टीवार म्हणतात, ही तर भाजपची ड्रामेबाजी- केंद्राला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करता आली नाही. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची सभा घ्यायची होती. कुंभमेळा भरवायचा होता. वेळीच विमानसेवा बंद केली असती तर कोरोना देशात आलाच नसता. 

- यूपीत नदीत वाहून गेलेल्या मृतांचे नातेवाईक आता भाजपला जाब विचारत आहेत. ज्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना नोकऱ्या दिल्या, त्यालाच बदनाम करून मते मिळवण्याची भाजपची ड्रामेबाजी आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा