शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'यस सर-यस मॅडम'च्या जागी आता शाळांमध्ये 'जय हिंद' बोलून लागणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 12:07 IST

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे.

सतना, दि. 13 -  मध्य प्रदेशच्या शिवराज सिंग चौहान सरकारने एक नवा वादग्रस्त आदेश जारी केला आहे. शिवराज सरकारमधील शिक्षण मंत्री विजय शाह यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सतना येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे.

सतना जिल्ह्यात हा प्रय़ोग यशस्वी झाला तर शिवराज सिंग चौहान यांच्या परवानगीने राज्यभरात हा आदेश लागू केला जाईल. सतनामधील खासगी शाळांवर हा आदेश लागू करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही असं विजय शाह म्हणाले. पण जय हिंदचा संबंध देशभक्तीसोबत असल्याने त्या शाळादेखील हा आदेश लागू करतील अशी अपेक्षा यावेळी विजय शाह यांनी व्यक्त केली.

आगामी काळात मध्य प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांशी या आदेशाला जोडून पाहिलं जात आहे. मध्य प्रदेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून मात्र अजूनपर्यंत यावर काही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. यापूर्वी वंदे मातरम् वरून देखील वाद झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ची सक्ती करण्यावरुन हा वाद झाला होता. त्यावेळी ‘वंदे मातरम् म्हणणे हा वैयक्तिक मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले होते. ‘ज्यांना वंदे मातरम् म्हणायचे नाही, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही,’ असेदेखील त्यांनी म्हटले होते.

महाराष्ट्राच्या विधानसभेतही वंदे मातरम् चा वाद बराच गाजला होता. भाजपाच्या आमदारांच्या ‘वंदे मातरम’च्या सक्तीच्या मागणीला त्यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार विरोध केला होता.

काय झालं होतं विधानसभेत- औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे बोलले होते. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.  

यानंतर आझमी यांनी इतिहासाचा दाखला दिला होता, 'देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहिले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही', असं आझमी बोलले होते.

यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला होता. 'देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', असं ठणकावलं होतं. 

दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये मध्ये वंदे मातरम बोलणं सक्तीचं केलं आहे. आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीSchoolशाळा