"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:09 IST2025-07-07T14:08:49+5:302025-07-07T14:09:40+5:30

Tahawwur Rana News : सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान,  तहव्वूर राणा याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

Yes, I was an agent of the Pakistani army, Tahawwur Rana made many shocking revelations during interrogation. | "हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट

"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट

सुमारे १७ वर्षांपूर्वी  २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाची  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने नुकतीच कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान,  तहव्वूर राणा याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू हस्तक होतो, तसेच आखाती युद्धादरम्यान, मला सौदी अरेबियामध्ये तैनात करण्यात आले होते, असे त्याने सांगितले.

कॅनेडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणाचं एप्रिल महिन्यात अमेरिकेमधून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं होतं.  तहव्वूर राणा याने चौकशीदरम्यान सांगितले की,  मुंबईमध्ये २०८ साली दहशतवादी हल्ल्यापूर्वी मी मुंबईतील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी केली होती. तसेच इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून डेव्हिड हेडली याला मुंबईमध्ये एक बनावट कार्यालय उघडण्यास मदत केली होती. त्याचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी केला होता, असेही राणा याने सांगितले.

दरम्यान, एनआयएमधील सूत्रांनी सांगितले की, लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेमध्ये असलेलं साटंलोटं तहव्वूर राणा याने उघड केलं आहे. २००५ मी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांसोबत मिळून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होतो, अशी माहिती त्याने दिली. दरम्यान, डेव्हिड हेडली आणि त्याच्यामध्ये झालेली ई-मेलची देवाणघेवाण, प्रवासाचे तपशील आणि इतर पुराव्यांचं विश्लेषण केलं जात आहे.  

Web Title: Yes, I was an agent of the Pakistani army, Tahawwur Rana made many shocking revelations during interrogation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.