येळकोट येळकोट जयमल्हार श्री खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:41+5:302014-12-20T22:27:41+5:30
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला़ येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात बेल भंडार्यांची उधळण करण्यात भाविक दंग झाले होते़ एकीकडे भाविक भक्तीभावात दंग झालेले असताना राजकीय मंडळी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते

येळकोट येळकोट जयमल्हार श्री खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल
श रीक्षेत्र माळेगाव यात्रेस शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला़ येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात बेल भंडार्यांची उधळण करण्यात भाविक दंग झाले होते़ एकीकडे भाविक भक्तीभावात दंग झालेले असताना राजकीय मंडळी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होतेमाळेगाव यात्रेसाठी दोन दिवसांपासून व्यापारी माळेगावात दाखल झाले आहेत़ शनिवारी भक्तांनी सकाळपासूनच श्री खंडोबा देवस्थानात दर्शनासाठी गर्दी केली होती़ यात संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातून भाविक आले होते. परंपरेनुसार खंडोबा देवस्थानातून पालखी काढण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्याच्या गजरात बेलभंडार, खोबर्याची उधळण करण्यात आली. जिल्हा परिषदेच्यावतीने या पालखीचे पुजन शासकीय विश्रामगृहात करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्षा मंगला गुंडीले, खा. सुनिल गायकवाड, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. विनायक पाटील, जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान माळेगाव यात्रेत राजकीय कुरघोडीलाही प्रारंभ झाला. जि.प. पदाधिकार्यांमध्ये बेबनावही उघडपणे दिसून येत होता. जिल्हा परिषदेच्यावतीने श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत विविध विविध स्टॉल लावण्यात आले. माळेगाव यात्रेत जनावरांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरल्या जातो. उंट, घोडे यासह विविध जनावरे, पशुपालक दाखल झाले आहेत.