शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांनी घेतली काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:10 IST

भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली.

ठळक मुद्देभाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली भेटीवेळी येडियुरप्पांसमवेत त्यांचे पुत्र आणि शिवमोगा येथील खासदार बी. वाय. राघवेंद्र हे सुद्धा उपस्थित दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिमोगा येथील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे औपचारिकपणे सांगण्यात येत आहे

बंगळुरू - भाजपाचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीकाँग्रेसचे दिग्गज नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. या भेटीवेळी येडियुरप्पांसमवेत त्यांचे पुत्र आणि शिवमोगा येथील खासदार बी. वाय. राघवेंद्र हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.  डी.के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी  येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात सुमारे तासभर ही चर्चा झाली. तसेच येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे.  मात्र दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिमोगा येथील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे औपचारिकपणे सांगण्यात येत आहे. मात्र येडियुरप्पा यांनी एक राजकीय आघाडी तयार करण्यासाठी शिवकुमार यांना ऑफर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र एकेकाळचे मित्र असलेल्या आणि आता प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवकुमार आणि येडियुरप्पा यांनी ही अफवा फेटाळून लावली आहे.  येडियुरप्पा म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी शिवकुमार यांची भेट घेतली. मी त्यांची भेट घेतली. यावेळी शिकारीपुरा, शिमोगा ग्रामीण आणि सोराबा विधानसभा मतदारसंघातील दीर्घकापासून प्रलंबित असलेल्या सिंचन योजना सुरू करण्यासाठी मी शिवकुमार यांना विनंती केली."  या बैठकीत येडियुरप्पांचे पुत्र राघवेंद्र यांनी सिंचन योजनांसाठी 2 हजार कोटी रुपयांची मागणी केली. त्याला शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी वन विभाग, जल संसाधन मंत्रालय आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारीही उपस्थित होते. येडियुरप्पा गेल्या दोन महिन्यांपासून मला भेटू इच्छित होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना भेटणे शक्य होत नव्हते, असे शिवकुमार यांनी सांगितले. मात्र कर्नाटकमधील या दोन नेत्यांच्या भेटीवेळी शिमोगा ग्रामीण मतदारसंघातील भाजपा आमदार के. बी. अशोक नायर आणि सोराबा येथील भाजपा आणदार कुमार बंगारप्पा यांची अनुपस्थिती असल्याने तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाcongressकाँग्रेस