शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

नर्स आणि तिच्या चिमुकलीच्या भेटीचा व्हिडिओ पाहून येडीयुरप्पा झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 5:50 AM

डोेळे पाणावले : कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असलेली नर्स पंधरा दिवसांपासून मुलीपासून दूर

बंगळुरू : बेळगाव येथील एका रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असलेल्या व पंधरा दिवस घरी न जाऊ शकलेल्या नर्सला तिच्या तीन वर्षे वयाच्या मुलीची लांबूनच भेट घ्यावी लागली. त्या क्षणाची व्हिडिओफीत पाहून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा खूप भावुक झाले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी राज्य सरकार प्राधान्याने सोडवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.व्हिडिओफीत समाजमाध्यमांवर झळकली असून, ती येडीयुरप्पांच्याही पाहण्यात आली. आईची भेट व्हावी म्हणून एका बालिकेने मांडलेला आकांत त्यांचे मन हेलावून गेला. ही नर्स व सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थी सेवेचे येडीयुरप्पा यांनी तिला दूरध्वनी करून तसेच एक पत्र लिहून कौतुक केले आहे. व्हिडिओफितीत दिसत असलेल्या नर्सचे नाव सुनंदा कोरेपूर असून, त्या बेळगाव इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. तिथे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्या गेले दोन आठवडे स्वत:च्या घरी जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची तीन वर्षांची मुलगी ऐश्वर्या आईची आठवण होऊन तिला भेटायचे आहे, असा वारंवार हट्ट करू लागली. (वृत्तसंस्था)आईच्या भेटीसाठी मुलगी व्याकूळच्व्हिडिओफितीत दिसत असलेल्या नर्सचे नाव सुनंदा कोरेपूर असून, त्या बेळगाव इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (बीआयएमएस) या संस्थेच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. रुग्णालयाने त्यांंच्या तात्पुरत्या निवासासाठी एका हॉटेलमधील खोली बुक केली असून, त्या दोन आठवड्यांपासून तिथे राहत आहेत.मुलगी अगदीच ऐकेना, त्यामुळे त्यांचे पती श्रीकांत यांनी ऐश्वर्या या आपल्या मुलीला हॉटेलच्या बाहेर आणले; पण ही भेट झाली काही मीटर अंतरावरून.च्ऐश्वर्याला आईच्या कुशीत जायची इच्छा होती; पण कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी दक्षता म्हणून सुनंदा कोरेपूर यांनी हॉटेलमधून लांबूनच आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले.च्आईजवळ जाता येत नाही म्हणून ऐश्वर्या धायमोकलून रडत होती. आई भेटल्याशिवाय मी जेवणारही नाही, असेही ती म्हणत होेती. त्यावेळी सुनंदा यांचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या