यंदाचा साखर हंगाम दहा वर्षांतील दुसरा नीचांकी हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 01:30 PM2019-12-27T13:30:04+5:302019-12-27T13:32:16+5:30

५५ लाख टनांवर उत्पादन घसरणार

This year's sugar season is the second lowest in ten years | यंदाचा साखर हंगाम दहा वर्षांतील दुसरा नीचांकी हंगाम

यंदाचा साखर हंगाम दहा वर्षांतील दुसरा नीचांकी हंगाम

Next
ठळक मुद्देसाखर हंगाम केवळ ९० दिवस चालेलगेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सुमारे ४० टक्के क्षेत्र उत्तर प्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज

पुणे : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाची अतिवृष्टी या कचाट्यात ऊस गाळप हंगाम सापडला आहे. गेल्या दहा वर्षांतील नीचांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर हंगाम केवळ ९० दिवस चालणार आहे. साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंत घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट होईल.
देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टी व गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊसक्षेत्र यामुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मराठवाडा व सोलापुरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम ९० व कर्नाटकातील गाळप हंगाम १०० दिवस चालेल. उत्तर प्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज आहे.  
आॅगस्ट व सप्टेंबरमधे राज्यात आलेल्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०१८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरून ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे ६२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, साखर उत्पादनात ५५ लाख टनांपर्यंत घट होईल, असा सुधारित अंदाजआहे. असे झाल्यास २००९-१० पासूनचा हा दुसरा नीचांकी गाळप हंगाम ठरेल. यापूर्वी २०१६-१७मध्ये नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. 
राज्यात २०१७-१८ व २०१८-१९ या हंगामात राज्यात १०७ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात तब्बल ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. या हंगामातील साखरेच्या कमी उत्पादनामुळे शिल्लकी साखर बाजारात आणणे शक्य होईल, असे साखर संघातील अधिकाºयांनी सांगितले. 
.......
साखर स्थिती    २०१९-२० अंदाज    २०१८-१९ प्रत्यक्ष स्थिती
साखर उत्पादन    ५५    १०७.२
स्थानिक खप    ७८    ७८.५
निर्यात    १८    १५.५
हंगामअखेरची शिल्लक    १३.७    ५४.७

Web Title: This year's sugar season is the second lowest in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.