उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 08:07 IST2020-12-12T05:13:30+5:302020-12-12T08:07:08+5:30
Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल.

उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग
लखनौ : प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल.
अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर या प्रश्नाचा गुंता सुटला. रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यास परवानगी देतानाच, अयोध्येत मशीद उभारण्यासाठी मुस्लिमांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर, अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पडले.
राममंदिराबाबत यंदाच्या वर्षात महत्त्वाच्या घडामोडी झाल्याने त्याच विषयावर चित्ररथ तयार करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. यंदा अयोध्येतील दीपोत्सवात ६ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. दीपोत्सवातले हे दिवे चित्ररथावर पुन्हा प्रकाशमान होणार आहेत. अयोध्यानगरीतला सामाजिक सलोखा दाखविणारे रामायणातील काही प्रसंगही या चित्ररथात असतील.