आंतरराष्ट्रीय आणि देशातील अर्थ व्यवहार पाहणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाचे एक्स अकाऊंटच हॅक झाले. या अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली, जी चर्चेचा विषय बनली. भारताच्या पीआयबीने ती रिपोस्ट करत पाकिस्तानची खिल्ली उडवली. ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली, पण ती काय होती आणि पीआयबीने काय म्हटलंय?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आम्हाला कर्ज द्या, तणाव कमी करण्यासाठी मदत करा
या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं की, 'शत्रूने प्रचंड नुकसान केल्याने पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना (देश) अधिक कर्ज देण्याचे आवाहन केले आहे. वाढत चाललेले युद्ध आणि शेअर बाजार कोसळत असून, हा तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याचे आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन करतो, अशी ही पोस्ट होती.
वाचा >>हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
भारताच्या पीआयबीने उडवली खिल्ली
चर्चेचा विषय ठरलेल्या ही पोस्ट भारताच्या प्रेस अण्ड इन्फर्मेशन ब्युरोने रिपोस्ट केली. गोलमाल सिनेमातील एक संवाद पोस्ट करत पाकिस्तानची खिल्ली उडवली. बघा काय आहे ती पोस्ट.
पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याच्या एक्स अकाऊंटवरून केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पाकिस्तान सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबद्दल अधिकृत खुलासा केला. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फॅक्ट चेकर अकाऊंटवरून सांगण्यात आले की, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.